Ad will apear here
Next
‘तरुण पिढीने सावित्रीबाईंच्या विचाराचा वारसा जपावा’
पाटील विद्यालयात सावित्रीबाई जयंती उत्साहात साजरी


सोलापूर : ‘राष्ट्राला विकासाकडे नेण्यासाठी आजच्या तरुण पिढीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा जपला पाहिजे,’ असे प्रतिपादन सुप्रभात ग्रुपचे सदस्य सूर्यभान चव्हाण यांनी केले.

पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री. शिवाजीभाऊ बाबा पाटील विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महादेवी लंकेश्वर यांनी भूषविले.

या वेळी व्यासपीठावर सरपंच दिनकर कदम, ‘रयत’चे जनरल बॉडी सदस्य बाळासाहेब पाटील, स्थानिक शाळा समितीचे सदस्य नागनाथ माळी, नारायण गायकवाड, मुख्याध्यापक एस. एम. बागल, माजी मुख्याध्यापक एम. जे. चौधरी, पर्यवेक्षक डी. एम. गणपाटील, पोपट भोसले, बाळासाहेब भोसले, दत्तात्रय भोसले, नवनाथ गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.



या वेळी श्री. चव्हाण यांनी मनोगतात कोणत्याही समाजातील मुली शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत याची काळजी ग्रामस्थांनी घेण्याची गरज असून, गरिबांच्या मुलींना उच्चशिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे नमूद केले. या प्रसंगी रयत सेवक चंद्रकांत मलपे यांच्या शोधनिबंधास राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार ग्रामस्थ व सुप्रभात ग्रुपतर्फे सरपंच दिनकर कदम यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी वक्त्या दीपाली फटे, बाळासाहेब पाटील व नारायण गायकवाड, चंद्रकांत मलपे आदींनी मार्गदर्शन केले.

या वेळी पालक, विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. ए. एस. कंदले यांनी आभार मानले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/QZXCBW
Similar Posts
पाटील विद्यालयाचा निकाल ८७ टक्के सोलापूर : रोपळे (ता. पंढरपूर) येथील रयत शिक्षण संस्थेच्या पाटील विद्यालयाचा इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल ८७.०७ टक्के लागला. या विद्यालयातील पहिले पाच विद्यार्थी भोसे (क.) केंद्रात चमकले. त्यामुळे या विद्यालयाने गुणवत्तावाढीचे उद्दिष्ट साध्य केले आहे.
चंद्रकांत मलपे यांच्या शोधनिबंधास राष्ट्रीय पुरस्कार सोलापूर : पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री. शिवाजीभाऊ बाबा पाटील विद्यालयातील रयत सेवक चंद्रकांत सीताराम मलपे यांच्या शोधनिबंधास राष्ट्रीय पातळीवरील ‘अॅवॉर्ड ऑफ मेरीट’ हा पुरस्कार मिळाला. गुजरात राज्यातील अहमदाबाद शहरात नुकतीच नववी राष्ट्रीय टीचर्स सायन्स काँग्रेस पार पडली.
गांधी विचार परीक्षेचा निकाल जाहीर सोलापूर : जळगाव येथील गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे घेतलेल्या गांधी विचार संस्कार परीक्षेचा जिल्हास्तरीय निकाल जाहीर झाला असून, यात रोपळे (ता. पंढरपूर) येथील पाटील विद्यालयातील दहावीची विद्यार्थिनी चैताली धोंडीराम भोसले हिने या परिक्षेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला
पंढरपूर येथे बुद्धिमान विद्यार्थी उन्हाळी वर्ग सोलापूर : ‘रयत शिक्षण संस्थेच्या शाळांमध्ये शिकलेला विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकण्यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी यावर्षी प्रथमच बुद्धिमान विद्यार्थी उन्हाळी वर्ग सुरू करण्यात आला आहे. हा उपक्रम पंढरपूर येथील यशवंत विद्यालयात सुरू करण्यात आला असून, यामध्ये सुमारे ११५ विद्यार्थी सहभागी झाले

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language